नियोजनकौशल्य, नेतृत्व आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनी देशपांडे !

नियोजनकौशल्य, नेतृत्व आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनी देशपांडे ! ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथमोपचार वर्ग आणि पाच जिल्ह्यांतील वाचक अन् धर्माभिमानी यांच्यासाठी दोन दिवसांचे प्रथमोपचार शिबिर ठेवले होते. त्याची सिद्धता करतांना पुणे येथील आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनी देशपांडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, आलेली अनुभूती आणि झालेले लाभ … Read more

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्रीवत्स विक्रम घोडके (वय २ वर्षे) !

कु. श्रीवत्स घोडके याचे आई-वडील यांना आलेल्या अनुभूती आणि श्रीववत्सची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या साधकाची त्यांच्याशी झालेली भावस्पर्शी प्रथम भेट आणि अनुभवलेली त्यांची प्रीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेले साधक व त्यांना अनुभवलेले गुरुदेवांचे प्रथम दर्शन आणि त्यांची अनुभवलेली प्रीती यांविषयी येथे देत आहे.

केरळ येथील श्री. साईदीपक यांना ‘ऑनलाईन विशेष संवाद’ कार्यक्रमात अभिप्राय संकलनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

मला एका डोळ्याने बारीक अक्षर वाचतांना त्रास होतो, तरीही मी सेवा चालू केली. मी झोकून देऊन सेवा केल्यावर माझ्या डोळ्यांवर येणारा ताण न्यून झाला. ‘माझ्या डोळ्यांची स्थिती सुधारत आहे’, असे मला जाणवले.

‘काळानुसार नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर सर्व नियोजन अन् कार्य करून घेत आहेत’, असे देवीने सूक्ष्मातून सांगण्याविषयी साधकाला आलेली अनुभूती

मला दिसले, ‘एक प्रतिष्ठित व्यक्ती सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना भेटायला येत आहे.’ मला वाटले, ‘ती व्यक्ती अशी अकस्मात कशी येईल ?’ तेव्हा देवीनेच उत्तर दिले, ‘ती व्यक्ती देवीची भक्त आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुर्गादेवीनेच गुरुदेवांना भेटण्याचा विचार तिच्या मनात घातला आहे.’

‘दोन्ही हात आकाशाच्या दिशेने झाल्यावर होणारी मुद्रा’ आणि ‘नमस्काराची मुद्रा’ यांतून मिळणार्‍या ऊर्जेच्या स्रोतामध्ये साधकाला जाणवलेला भेद !

एकदा मी हात चोळत असतांना माझ्या दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने झाले आणि त्या वेळी ऊर्जेचा मोठा स्रोत हातांच्या बोटांच्या माध्यमातून माझ्या शरिरात जात होता आणि मला पुष्कळ संवेदना जाणवत होत्या.

सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर यांना नामस्मरण करत असतांना आलेली अनुभूती

मला नामजप करतांना अकस्मात् माझ्या भोवती गुलाबी रंगाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवले. काही वेळाने मला माझ्या कमरेच्या वरील भागात परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.

उच्चपदस्थ नौदल अधिकारी आणि त्यांच्या पत्नी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिल्यावर व्यक्त केलेले मनोगत !

आश्रमात पुष्कळ शांत आणि उत्साही वाटत होते. आश्रमातील स्वच्छता आणि शांत वातावरण, यांमुळे माझे मन एकदम उत्साही झाले. आश्रमाला भेट दिल्यावर मी ज्यांची कल्पना केली नव्हती, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने नामजप होत असल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपाशीर्वादाने माझा नामजप पुष्कळ वेळ होत आहे.

रत्नागिरी येथील सौ. स्नेहा ताम्हनकर यांना श्री वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेवर वाहिलेल्या हळदी-कुंकवामध्ये ‘ॐ’चा आकार निर्माण झाल्याचे दिसणे

आषाढी एकादशी या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता मी प्रतिसप्ताहाप्रमाणे श्री वैभवलक्ष्मीसमोर दिवा प्रज्वलित केला आणि देवीला हळदी-कुंकू वाहून नमस्कार केला. त्या वेळी देवीच्या प्रतिमेवर वाहिलेल्या हळदी-कुंकवामध्ये ‘ॐ’चा आकार दिसत असल्याचे माझ्या लक्षात आले.