धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा प्राप्त कशी करावी ?
‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणे, हा बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा देशद्रोहच नव्हे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतात अल्पसंख्यांकांवर राज्य करता न येणारे सर्व राजकीय पक्ष कधी मुसलमान बहुसंख्य असलेल्या काश्मीरवर राज्य करू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हनुमंताने व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार्यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विज्ञान हे अध्यात्मशास्त्राचे एक भरकटलेले पिल्लू आहे. आज ना उद्या ते सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल आणि त्याच्याशी एकरूप होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आयुष्यात आलेल्या अनेक कटू अनुभवांनंतर किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे म्हातारपणी मनुष्याला जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. त्याला जीवन सोडून द्यावेसे वाटते. आयुष्यभर ज्या मृत्यूची भीती वाटत असते, ती जाऊन ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटू लागते.’
‘हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. एवढेच नव्हे, तर ‘सर्वधर्मसमभाव’, असा अत्यंत चुकीचा शब्द शिकवला जातो, जो इतर एकही धर्म शिकवत नाही. त्यामुळे हिंदूंची नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी’ शब्दाचा अर्थ आहे ‘मुत्सद्दी’; पण कलियुगातील हल्लीचे राजकारणी राष्ट्र किंवा धर्म यांच्यासाठी मुत्सद्देगिरी न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले