रथयात्रा ही गुरुदेवांची, जीवन धन्य करणारी ।

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्सव (टीप) पहात असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. रथोत्सव पाहिल्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जीवन धन्य केले’, असे मला वाटले. त्यांच्याच कृपेने सुचलेल्या काव्यपंक्ती त्यांनीच लिहून घेतल्या आहेत. त्या पुढे दिल्या आहेत.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने व्याख्यानाच्या प्रसाराची सेवा करतांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘गुढीपाडव्याच्या व्याख्यानाची सेवा करतांना आणि व्याख्यान चालू असतांनासुद्धा प्रभु श्रीरामचंद्रांच्या त्रेतायुगातील काळ अनुभवता आला.’

बंगालमध्ये सेवारत असतांना एका धर्मप्रेमीने अनुभवलेली ईश्वराची कृपा !

बंगालमधील वातावरणात रज-तम अधिक असल्याने साधक विचारतात, ‘‘तुम्ही तिथे साधना कशी करता ?’’ तेव्हा लक्षात आले, ‘बंगालमध्ये असतो, तेव्हा तुलनेत साधना अधिक चांगली होते; कारण ईश्वराचे धर्मप्रेमी समवेतचे अस्तित्व अधिक प्रमाणात कार्यरत असते.

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त सहभागी होणार्‍या केरळमधील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे

‘जर मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’तून गुरूंचे महत्त्व कळल्यावर आनंद मिळाला, तर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर किती आनंद होत असेल !’, हे मला व्यक्त करता येणार नाही. ‘धर्माचा प्रसार करणारा प्रत्येक साधक त्याच्या गुरूंवर सर्व सोपवून पुढे जातो’, हे मला समाजातील काही प्रसंगांतून शिकायला मिळाले.’ 

१३ जुलै २०२२ या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेला आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

‘‘सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार आहेत.’’ तेव्हा सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे शब्द आठवले आणि ‘त्यांच्या माध्यमातून भगवंताने संकेत दिला होता’, असे माझ्या लक्षात आले. 

मुंबई येथील श्री. दिव्यांक हिरेकर (वय २० वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथे झालेल्या युवा साधना शिबिराला येण्यापूर्वी आलेले अडथळे आणि नंतर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मानस अभिषेक करतांना ‘गुरुदेव डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे जाणवणे

‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार असल्याचे साधिकेला जाणवणे आणि प्रत्यक्षातही तसेच होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची दत्तगुरूंच्या रूपात पाद्यपूजा चालू असतांना मला ‘ते साक्षात् दत्तरूपातच विराजमान आहेत’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसत होते. सनातन पुरोहित पाठशाळेचे ३ पुरोहित मंत्रपठण करत असतांना ‘ते तिघे दत्तगुरुच आहेत’, असेही मला वाटत होते.

पुणे येथील श्री. रणजित काशीद आणि सौ. सोनाली काशीद यांना फोंडा (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रातील कार्यशाळेत आणि ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

२१.७.२०२२ या दिवशी फोंडा, गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला आरंभ झाला. त्या वेळी पुणे येथील श्री. रणजित आणि सौ. सोनाली काशीद यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘त्यांचे छायाचित्र जिवंत झाले आहे’, असे जाणवणे

२२.१०.२०२१ या दिवशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत होते. त्या वेळी मला ‘परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राकडे पहात रहावे’, असे तीव्रतेने वाटत होते.

रामनाथी आश्रमातील कु. सानिका सोनीकर (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने शिबिरात आल्यावर काही वेळाने मला सर्व साधकांच्या भोवती श्रीकृष्णतत्त्वाचे कवच दिसले.