नाशिक येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात आढळले वन्य प्राण्यांचे अवयव !

येथील तेली गल्ली येथील दीपक चांदवडकर यांच्या मालकीच्या ‘सुकामेवा आणि काष्ट औषधी’ दुकान क्रमांक ३ वर वन विभागाने ५ जुलै या दिवशी धाड टाकली. तेथे त्यांना वन्य प्राण्यांचे विविध अवयव आढळून आले.

मुंबई महापालिकेच्या मंडईमधील दुर्घटनेतील आरोपीवर कारवाई करण्यास आयुक्तांचा नकार !

माझगाव येथील बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जण मृत्यूमुखी पडले होते. ही दुर्घटना होऊन ९ वर्षे उलटूनही आरोपी असलेल्या महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर फौजदारी कारवाई करण्यास पालिकेच्या आयुक्तांनी नकार दिला.

शरद पवार यांची भेट घेतली, ही अफवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेतचे माझे छायाचित्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

संभाजीनगर येथील आकाशवाणीच्या निर्णयाचा ५० हौशी कलावंतांना फटका !

आता प्रतिदिन स्थानिक पातळीवर प्रसारित होणारे कार्यक्रम आठवड्यातून एकदा किंवा देशपातळीवर एकाच ठिकाणाहून प्रसारित करण्याचा निर्णय आकाशवाणीने घेतला आहे.

पंढरपूर येथे १५० किलो भेसळयुक्त पेढे जप्त !

पवित्र अशा तीर्थक्षेत्री भेसळयुक्त पेढा विकण्याची बुद्धी होणार्‍यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे. हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यामुळे भेसळ केलेले अन्नपदार्थ विकल्याने काय होते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !

चांदूरबाजार (जिल्हा अमरावती) शहराच्या वस्तीत आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत !

४ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील आसपासच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील पूल वाहून गेला आहे.

दरड कोसळल्याने ८५ जणांचे, तर भूमीला भेगा पडल्याने ७० जणांचे स्थलांतर

पोलादपूर तालुक्यात दरड कोसळल्याने, महाड तालुक्यात भूमीला भेगा पडल्याने लोकांचे स्थलांतर करण्यात आले तसेच आसपासच्या गावांतील ५८० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

वीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट !

विधानसभा अध्यक्षविरोधी याचिकेवर ११ जुलैला निर्णय होणार !

शिवसेनेच्या वतीने नियुक्त केलेल्या प्रतोदना अवैध ठरवत एकनाथ शिंदे यांच्या गटाने नियुक्त केलेल्या प्रतोदच्या ‘व्हीप’ला मान्यता देण्याच्या नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका प्रविष्ट करून आव्हान देण्यात आले आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूर संस्थानाचे पांडुरंगाच्या महापूजेसाठी आमंत्रण !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी ५ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली.