शरद पवार यांची भेट घेतली, ही अफवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेतचे माझे छायाचित्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. महाविकास आघाडीमध्ये राज्याचे नगरविकासमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीचे हे जुने छायाचित्र आहे.