नाशिक येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात आढळले वन्य प्राण्यांचे अवयव !

  • वन विभागाकडून धाड !

  • दुकानमालकावर गुन्हा नोंद

नाशिक – शहरातील रविवार कारंजा हा परिसर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातही तेली गल्ली येथील ‘दगडू तेली’ या आयुर्वेदीय दुकानांत नागरिकांची गर्दी असते; मात्र येथील काही दुकानांत आयुर्वेदाच्या नावाखाली वन्य प्राण्यांच्या अवयवविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.

तेली गल्ली येथील दीपक चांदवडकर यांच्या मालकीच्या ‘सुकामेवा आणि काष्ट औषधी’ दुकान क्रमांक ३ वर वन विभागाने ५ जुलै या दिवशी धाड टाकली. तेथे त्यांना वन्य प्राण्यांचे विविध अवयव आढळून आले. हे अवयव अधिक पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, तसेच वन विभागाने दीपक चांदवडवर यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.