यवतमाळ जिल्हा परिषदेत अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईची चेतावणी !

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी अचानक दिलेल्या कार्यालयीन भेटीत अनेक विभागांमध्ये ३३ कर्मचारी विनाअनुमती अनुपस्थित आढळले.

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

दोघांमध्ये दीड घंटा चर्चा झाली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली, हे अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे ! – ‘जनसंवाद सभे’ची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? जनतेची अडचण दिसत नाही की, यामध्येही भ्रष्टाचार केलेला आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प वाचवण्याची राज्यपालांकडे विनंती !

झोपडपट्टीवासियांच्या संघटनेचे राज्यपालांना निवेदन

पुण्यातील ‘ताबूत इनाम एन्डॉमेंट ट्रस्ट’ची ८ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त !

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या इम्तियाज महंमद प्रकरणामध्ये ‘ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्ट’ची ८ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) २६ एप्रिल या दिवशी जप्त केली.

नाशिकच्या माजी पोलीस आयुक्तांचा भोंग्यांविषयीचा आदेश रहित !

नवपोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचा निर्णय !

रमजान ईदनिमित्त मीरारोड पोलिसांकडून इफ्तार पार्टी !

या पार्टीला स्थानिक मशीद आणि मदरसे यांतील मौलाना, स्थानिक मुसलमान यांसह मीरारोड, वसई, विरार येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक येथे आमदार अमोल मिटकरी यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आंदोलन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. येथील ब्राह्मण समाजातील शेकडो कार्यकर्ते २७ एप्रिल या दिवशी रस्त्यावर उतरले.

राज्यात वाहनांच्या वायूप्रदूषण चाचणीच्या दरांत वाढ !

वाहनांची वायूप्रदूषण पडताळणी करून वायूप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट (पीयूसी)) मिळवणे आता महाग होणार आहे. या चाचणीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन विभागाने सांगितले.