व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्धकर्म करण्याचे महत्त्व आणि श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्धामुळे होणारे लाभ !

मृत झाल्यानंतर करण्यात येणार्‍या श्राद्धकर्मांचा मुख्य आधार ‘श्रद्धा’ हाच असून श्रद्धेमुळेच फळ मिळते. मृत व्यक्तीला श्राद्धकर्मांचे फळ मिळाल्याचे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ‘मृत व्यक्तीसाठी केलेल्या श्राद्धकर्मांचे फळ तिला निश्चित मिळते’, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.

संतांचे वागणे, आत्मज्ञानाचा अधिकार आणि स्थिरबुद्धी यांविषयी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातील विवेचन

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥

पितृपक्ष विशेष : सनातन संस्थेच्या ‘श्राद्धविधी’ या Mobile App चा लाभ घ्या !

सनातन संस्थेचे ‘श्राद्धविधी । Shraddha Rituals’ हे अ‍ॅप श्राद्ध संबंधी माहिती देणारे असून ते मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगू, मल्याळम अशा ७ भाषांत आहे.

कोरोना महामारीच्या काळात करावयाच्या घरगुती गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन !

गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन व श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती.

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम

स्तोत्रपठण ‘तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक’, म्हणजे ‘त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह’ झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त झाला पाहिजे.

हिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या !

आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजन केली आहे !’

मूर्तीदान नको, विसर्जनच योग्य !

महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.

गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती.

यज्ञाचे मंत्र म्हणतांना भाव आणि उच्चार यांचे महत्त्व

अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.