‘शालेय पोषण आहार योजना’ कुणासाठी ?

प्रत्यक्षात ‘शालेय पोषण आहार’ योजना ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना चांगला आहार मिळावा, यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून राबवण्यात येत आहे. २६ वर्षे उलटून गेल्यानंतरही मुलांना उत्कृष्ट प्रतीचा आहार मिळू शकत नाही, ही शोकांतिकाच आहे.

शेतकरी आणि कामगार यांना वाली कोण ?

मधुकर सहकारी साखर कारखान्याप्रमाणे देशामध्ये अशाच प्रकारच्या समस्या अनेक ठिकाणी आहेत. अशा समस्या सुटण्यासाठी देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळा यांची बजबजपुरी संपणे आवश्यक आहे. यासाठी शासनकर्त्यांनी इच्छाशक्ती वाढवून भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करावी, हीच अपेक्षा !

‘संस्कार’ महत्त्वाचे !

हिंदु विवाह संस्कार हा सर्वांच्याच हिताचा असून विवाहात अनेक प्रकारचे विधी, प्रत्येक विधीचे वेगवेगळे मंत्र आहेत. विवाहाच्या मंत्रांचा अर्थ नीट समजून घेतला, तर ‘या प्रकारानेच विवाह व्हावा’, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटेल. सर्व संस्कार यथाविधी केल्याने देवतांची कृपा होते.

प्रथम विकृतींना दहन करा !

लव्ह जिहादच्या समस्येशी लढतांना मी, माझे कुटुंब, पद, प्रतिष्ठा या संकुचितता निर्माण करणार्‍या विकृतींचे प्रथम दहन करूया !

वाहतूक नियमांची प्रभावी कार्यवाही व्हावी !

‘कायदे तितक्या पळवाटा’, असे असले, तरी प्रभावी कार्यवाही झाली, तरच वाहनचालक पुन्हा चूक करण्यास धजावणार नाहीत, हे निश्चित !

धर्मांधांचा उद्दामपणा !

काही राज्यांमध्ये तर मतांसाठी तेथील स्थानिक सरकार जनतेला वीज, पाणी विनामूल्य देण्याचे आश्वासन देत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्ये कर्जबाजारी होत आहेत. परिणामी त्या कर्जाचा भार देशावर पडत आहे. अशी फुकट खाण्याची सवय जनतेला लावली, तर देश दिवाळखोरीकडे जायला वेळ लागणार नाही.

‘सनबर्न’ नव्हे, तर ‘संस्कृतीबर्न’ फेस्टिव्हल !

देशाची भावी पिढीच व्यसनाच्या आहारी जात असेल, तर भारताला महाशक्ती करण्याचे उद्दिष्ट कधीतरी साध्य होऊ शकते का ? याचा गांभीर्याने विचार या निमित्ताने होणे आवश्यक आहे, तसेच युवकांनीही क्षणिक मोहापायी, नशेच्या आहारी जाऊन अशा निरर्थक महोत्सवांमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.

आपण यंत्रांसाठी कि यंत्र आपल्यासाठी ?

ईश्वरनिर्मित शरीररूपी यंत्र अमूल्य आहे. भगवंताच्या कृपेने मिळालेले हे शरीर आपल्याला विनामूल्यच मिळाले आहे; परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर न केल्यास होणारी हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यामुळे अन्य यंत्रांपेक्षा भगवंताने दिलेले शरीररूपी यंत्राचे महत्त्व जाणून त्याचा सांभाळ योग्य पद्धतीनेच करायला हवा.

विवाहविधी धर्मशास्त्रानुसार करा !

आपण जन्महिंदु असून स्वतःला अतीप्रगत दाखवण्याच्या नादात आपल्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवत स्वतःची हानी करून घेत आहोत.

पैशांचा हव्यास ?

‘आवश्यक तितकाच धनसंचय करूया आणि निःस्वार्थी हेतूने समाज, राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करणार्‍या संतांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी झटूया.