गावांमध्ये मूलभूत विकास होणे आवश्यक !

७ दशके उलटून गेल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा न मिळणे संतापजनकच आहे.

रखडलेला माहिती अधिकार !

माहिती अधिकार हा सामान्य नागरिकांना जलद गतीने न्याय मिळवून देण्यासाठी एक आशेचा किरण आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत आणि माहिती देण्यासाठी कुचराई करणारे आणि पैसे मागणारे  अधिकारी यांवर कठोर कारवाई करावी, हीच सुजाण नागरिकांची अपेक्षा !

महिला आयोग याचा विचार करील ?

महिला अत्याचारांविषयी आता केवळ सामाजिक माध्यमे आणि वृत्तमाध्यमे यांमध्ये मतप्रदर्शन नको, तर त्यावर ठोस उपाययोजना, कठोर कायदे अन् त्यांची प्रभावी कार्यवाही आवश्यक आहे.

‘भगवद्गीता’च विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

आताच्या शिक्षणव्यवस्थेत या भीषण समस्येवर मात करण्यासाठी काहीच तोडगा नसणे, हे मोठे अपयश आहे. मनातील कचरा साफ करून माणूस म्हणून जगण्यासाठी श्रीमद्भगवद्गीताच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.

रामघळ-कुबडीतीर्थ विकासाच्या प्रतीक्षेत !

सातारा जिल्ह्यात जन्मलेले एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वत: धार्मिक असून त्यांनी आतापर्यंत पर्यटनविकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, असे समर्थभक्तांना वाटते.

गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न हवेत !

सरकारी शाळांमधील प्रवेशाचा आलेख चढताच ठेवायचा असेल, तर सर्व प्रकारच्या उणिवांवर मात करण्यासह पुरेसे शिक्षक आणि मूलभूत सुविधा द्यायला हव्यात. शाळा बंद करण्याऐवजी गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न करायला हवेत.

प्रार्थना आणि श्रद्धेचे बळ !

लंपी रोगापासून गायींचा बचाव होण्यासाठी श्री. महादेव देसाई यांनी द्वारकाधीश श्रीकृष्णाला नवस केला. ‘जर माझ्या गायी वाचल्या, तर मी तुझ्या दर्शनाला माझ्या २५ गायींसह चालत येईन.’ जेव्हा सगळ्याच गायी वाचल्या, तेव्हा ते द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी (अंतर ४५० कि.मी.) आपल्या गायींसमवेत आले.

भ्रमणभाषच्या अतीवापराने आरोग्य बिघडू देऊ नका !

व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले असेल, तरच तो अनेक गोष्टी करू शकतो. मानसिक स्थितीच नीट नसेल, तर अन्य गोष्टी असून नसून सारख्याच आहेत. यातून मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्माची कास धरणे अनिवार्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होते !

केवळ जनजागृती नको !

संपूर्ण जग शिक्षेच्या भीतीपोटी योग्य वागते. त्यामुळे तंबाखू नियंत्रणासाठी केवळ जनजागृती करून नाही, तर कायद्याची कठोर कार्यवाही होणेच आवश्यक आहे. आतातरी प्रशासन याचा गांभीर्याने विचार करून कठोर शिक्षा करणे अवलंबेल का ?

वाहतुकीचे नियम शालेय अभ्यासक्रमात घ्या !

वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश हवा. यामुळे नव्या पिढीवर वाहतुकीचे नियम आणि शिस्त यांचे संस्कार होतील, तसेच प्रत्येकाला आपल्या प्राणाची अन् इतरांच्या प्राणाची किंमत असणेही महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रबोधन शालेय जीवनातून होणे आवश्यक !