
तुळजापूर (धाराशिव) – श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या ७ दिवसांच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची पारंपरिक धार्मिक विधींनुसार आणि घटोत्थापनाने भावपूर्ण सांगता करण्यात आली. २८ डिसेंबर या दिवशी घटस्थापनेने प्रारंभ झालेल्या या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. नवरात्रकाळात मंदिरात देवीची विशेष पूजा आणि विविध धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडले. उत्सवाच्या सांगतादिनी दुपारी मंदिरात घटोत्थापनाचा विधी संपन्न झाला. या वेळी मंदिरातील होमामध्ये कोहळा आणि नारळ यांची पूर्णाहुती अर्पण करून उत्सवाची विधीवत् सांगता करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत, तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी आणि पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान