हडफडे येथील नाईट क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘सुराज्य अभियान’च्या वतीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन

पणजी- ३० डिसेंबर हडफडे येथील नाईट क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘सुराज्य अभियान’ने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये सार्वजनिक सुरक्षेला धोका पोचवणाऱ्या राज्यातील अनधिकृत नाईट क्लब्सवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देतांना ‘सुराज्य अभियान’चे श्री. प्रमोद नाणोस्कर, अधिवक्ता रूपेश गावस आणि श्री. राज बोरकर यांची उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की, हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे गोव्यातील सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे गोव्यातील अनेक नाईट क्लब्स, पाटर्चा किंवा मोठे कार्यक्रम करण्याची ठिकाणे यांच्याकडे अनिवार्य अग्नीसुरक्षा अनुज्ञप्ती (परवाना) नसणे, आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करणे आदी अनेक त्रुटी असल्याचे उघड झाले आहे; मात्र या दुर्घटनेनंतर प्रशासन सक्रीय झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. घटनेनंतरची कारवाई पुरेशी नसून राज्यभर कडक, पारदर्शक आणि कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर ‘सुराज्य अभियान’ने
पुढील मागण्या केल्या आहेत.
१. हडफडे येथील दुर्घटनेच्या प्रकरणी नाईट क्लबच्या व्यवस्थापनासह इतरांचे दायित्व निश्चित करून दोषी सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
२. राज्यातील सर्व नाईट क्लब्स आणि पाट्यांची ठिकाणे यांचे तात्काळ ऑडिट (परीक्षण) करून अनुज्ञप्ती, अग्नीसुरक्षा, क्षमता अन् सुरक्षा व्यवस्था यांची पडताळणी करावी. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, तसेच नाईट क्लब आदी ठिकाणांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करून त्याची कठोर कार्यवाही करावी.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली