
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा २० डिसेंबर या दिवशी चालू होत आहे. त्या निमित्ताने सायंकाळची अभिषेक पूजा सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मेण काढणे आणि इतर धार्मिक विधी रात्री ७.३० पर्यंत पूर्ण होऊन रात्री ७.३० ते ८ पर्यंत देवीची मंचकी निद्रा हा धार्मिक विधी पार पडेल.
२८ डिसेंबरपासून देवीच्या शाकंभरी नवरात्रास प्रारंभ !
२० ते २८ डिसेंबर या कालावधीत देवीची निद्रा संपल्यावर २८ डिसेंबर या दिवशी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल. यानंतर दुपारी १२ वाजता घटस्थापना होईल. २९ डिसेंबर या दिवशी देवीची रथ अलंकार महापूजा, ३० डिसेंबर या दिवशी देवीची मुरली अलंकार महापूजा, ३१ डिसेंबर या दिवशी जलरात्रा, शेषशाही अलंकार महापूजा, १ जानेवारी या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा, अग्निस्थापना-शतचंडी होमास प्रारंभ, २ जानेवारी या दिवशी देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा. ३ जानेवारी या दिवशी शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने देवीची नित्योपचार महापूजा, दुपारी १२ वाजता पूर्णाहुती, घटोत्थापन, रात्री छबीना आणि जोगवा, ४ जानेवारी या दिवशी अन्नप्रसाद महाप्रसादाने नवरात्रीची समाप्ती होईल.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान