
पुणे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – दसर्यानिमित्त येथे मोठ्या प्रमाणावर सामूहिक शस्त्रपूजनाचे आयोजन केले होते. पुणे जिल्ह्यात २३ ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन झाले. ५०० हून अधिक धर्मप्रेमी यामध्ये सहभागी झाले. अनेक ठिकाणी धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची सिद्धता, तसेच नियोजन केले. महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. सामूहिक शस्त्रपूजनानंतर उपस्थितांनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेऊन श्री दुर्गादेवीचा सामूहिक नामजप केला. अनेक ठिकाणी शेतीची कामे चालू असूनही अनेकांनी वेळ काढून शस्त्रपूजनामध्ये सहभाग घेतला. नवरात्रीच्या कालावधीत काही मंदिरांमध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शेवटच्या दिवशी शिबिराची सांगता होतांना धर्मप्रेमींना शस्त्रपूजनाचे महत्त्व सांगितल्यानंतर सर्वांनी भावपूर्णपणे पूजनाची सिद्धता केली. शस्त्रपूजनानंतर सर्वांनी शौर्य जागृत करणार्या ‘हिंदु राष्ट्रा’च्या घोषणा दिल्या.

१. मंदिरे आणि देवस्थानच्या भूमी पुन्हा मंदिरे अन् देवस्थाने यांना मिळाव्यात या संदर्भात ‘अँटी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा’ (बेकायदेशीर भूमी बळकावण्याच्या विरोधात कायदा) अमलात आणावा, यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने सासवड येथील हनुमान मंदिरात शस्त्रपूजन करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
२. बारामती येथे रणरागिणी शाखेच्या माध्यमातून शस्त्रपूजन झाले. यानंतर उपस्थित महिलांनी अर्धा घंटा श्री दुर्गादेवीचा भावपूर्ण नामजप केला.
३. काळेपडळ, तुकाई दर्शन, हडपसर येथील राधाकृष्ण मंदिरात शाखेतील धर्मवीरांनी दसर्याच्या शुभमुहूर्तावर मंदिर विश्वस्तांच्या साहाय्याने मंदिरावर भगवा ध्वज फडकवला. मंदिर विश्वस्तांनी शस्त्रपूजनासाठी शस्त्र उपलब्ध करून दिले.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !