ट्रम्प यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो आता भारतातील जातींवर घसरले
(डिप स्टेट म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेद्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.)

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाचे तेल खरेदी करण्यावरून भारतावर ५० टक्के अतिरिक्त शुल्क लादणार्या अमेरिकेचा विद्रुप भारतविरोधी चेहरा आता समोर येऊ लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे सर्वाेच्च व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटले आहे की, रशियाचे तेल भारतीय ब्राह्मणांना लाभ मिळवून देत आहे. याआधीच्या नवारो यांच्या वक्तव्यांत त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाला ‘मोदी युद्ध’ म्हटले होते. तसेच रशियाच्या तेलाचा लाभ भारतातील काही व्यावसायिकांनाच होत आहे, असे त्यांचे वक्तव्यही समोर आले होते. नवारो यांनी हेसुद्धा म्हटले होते की, अमेरिकेचे युद्ध हे भारताच्या संस्कृती आणि सभ्यता यांच्याशी आहे. आता मात्र त्यांनी भारताच्या अंतर्गत सामाजिक रचनेवरच प्रहार करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
⚠️ US interference alert!
Trump’s Trade Advisor Peter Navarro now comments on Indian castes –
🗣️ “Brahmins benefit from Russian oil!”
🇺🇸 First they tried to break India’s economy. Now they target Hindu unity.
🚨 Hindus, beware! If Congress & anti-Brahmin lobbies amplify this,… pic.twitter.com/cBdBgMDUhI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 1, 2025
नवारो यांचे हे विधान वेडेपणाचे नाही, तर त्यामागे एक खोल राजकीय विचारसरणी लपलेली आहे. अमेरिका ‘ब्राह्मणांविरुद्ध’ हिंसाचार इच्छिते का ?, असे प्रश्न तज्ञांकडून विचारले जाऊ लागले आहेत. यात वरिष्ठ पत्रकार अभिजित मजुमदार यांचे वक्तव्य विचारप्रवण करणारे आहे.
भारतात सत्ता उलथवून लावण्यासाठी अमेरिकेने चालवले प्रयत्न ! – मजुमदार
मजुमदार यांनी म्हटले की, ट्रम्प प्रशासन भारतातील जातीय विभाजनाचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात ‘डीप स्टेट’-साम्यवादी-इस्लामवादी यांची रणनीती स्वीकारत आहे. हा प्रयत्न अत्यंत भयावह आहे. अमेरिकेने आता भारतात अशांतता पसरवण्यास आरंभ केला आहे. येत्या काळात भारतात वांशिक हिंसाचार उफाळण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्था त्यामागे असू शकतात. अमेरिकेने आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे भारतात सत्ता पालटण्याचा प्रयत्न चालू केला आहे अन् त्यासाठी ती वांशिक द्वेष आणि हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे नाकारता येत नाही.
‘द स्किन डॉक्टर’ नावाच्या प्रसिद्ध ‘एक्स’ खात्याने म्हटले की, काही ‘स्वद्वेषी’ भारतीय अमेरिकेला भारताच्या कमकुवतपणावर आक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत किंवा ते ‘जातीयुद्धां’ना प्रोत्साहन देऊन भारतात सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणार्यांशी हातमिळवणी करत आहेत किंवा दोन्ही !
संपादकीय भूमिका
|
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !