शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा नोंद
वसई – शिकवणीवर्गातील शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे गंभीर घायाळ झालेली दीपिका पटेल (वय १० वर्षे) वाचली आहे. ती २२ दिवस कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होती. तिच्यावर विविध शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवण्यात आधुनिक वैद्यांना यश आले. आता ती घरी परतली आहे. दीपिका शिकवणीवर्गात मस्ती करत असल्याने शिक्षिका रत्ना सिंह (वय २० वर्षे) हिने तिच्या उजव्या कानशिलात लगावली. यात तिच्या श्वसननलिकेसह मेंदूला इजा झाली. तिला खासगी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. तिच्या उपचारांसाठी लाखो रुपये खर्च आल्याने कुटुंबीय कर्जबाजारी झाले आहे. मारणार्या शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशांच्या शिकवणीवर्गांवर बंदीच आणायला हवी ! |