बीड – परळी येथील डॉ. यशवंत उपाख्य दुष्यंत देशमुख यांच्या चिकित्सालयात उपचारांसाठी एक २१ वर्षीय तरुणी आली होती. तेव्हा डॉक्टरांनी शरीरसुखाची मागणी करण्यासह विनयभंग केला. तेव्हा विरोध केल्यावर पीडित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करण्यासह जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार तिने परळी पोलीस ठाण्यात केली. संबंधित डॉक्टरांवर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच संबंधित डॉक्टर पसार झाला आहे. (पोलिसांनी गुन्हा नोंद झाल्यावर संबंधित डॉक्टरला त्वरित अटक का केली नाही ? ही पोलिसांची अकार्यक्षमता नाही का ? – संपादक) या प्रकरणी स्थानिक व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळला आहे.