कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे दर्शवणारी घटना !
अंधेरी – एका मद्यपी चारचाकी चालक सभ्यसाची निशांक याने स्थानिक पोलीस हवालदार जयवंत मोरे यांच्या अंगावर गाडी घातली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळावरून पळ काढतांना बॅरिकेड्स तोडले. यात रस्त्यावरील २ – ३ गाड्यांची हानी झाली आहे. ही घटना अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.