मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रे हॅक करण्यासाठी आर्थिक व्यवहार करत असल्याचा एक कथित व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. या व्हिडिओतील व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘इ.व्ही.एम्.’ हॅक करण्याविषयीचा हा कथित व्हिडिओ निराधार आणि खोटा आहे. ‘इ.व्ही.एम्.’ यंत्र नेटवर्कशी जोडता येत नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने ‘एक्स’ खात्यावर दिले आहे. या कथित व्हिडिओमध्ये ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रे हॅक करण्यासाठी ५४ कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे दिसत आहे.
‘हॅक’ करणे म्हणजे काय ?
‘हॅक’ करणे म्हणजे एखादे अन्यांच्या ‘सॉफ्टवेअर’चा अवैधरित्या ताबा मिळवणे होय. अन्यांचे ईमेल, ‘एक्स’ खाते आदी ‘हॅक’ करून त्यामधील माहिती चोरली जाते किंवा त्यांचा चुकीचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे सॉफ्टवेअर ‘हॅक’ करणार्यांना ‘हॅकर्स’ म्हटले जाते.
संपादकीय भूमिका‘इ.व्ही.एम्.’ यंत्रे ‘हॅक’ करण्याचे कथित व्हिडिओ प्रसारित करणार्यांच्या मागे कोण आहे ? हे शोधणे आवश्यक ! |