उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. रुद्र राहुल अवताडे हा या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. सौ. रोहिणी राहुल अवताडे (रुद्रची आई), चंद्रपूर
१ अ. जन्मापूर्वी
१. मी गर्भारपणात श्रीमद्भगवद्गीता आणि राणी लक्ष्मीबाई या ग्रंथांचे वाचन केले.
१ आ. जन्मानंतर
१. कु. रुद्रचा स्वभाव शांत आहे. मला त्याच्या चेहर्याकडे पाहिल्यावर शांत वाटते.
२. जिज्ञासू वृत्ती : तो प्रतिदिन न चुकता वर्तमानपत्र वाचतो. त्याला अध्यात्म, सामान्यज्ञान अशा पुष्कळ गोष्टींची आवड आहे. त्याची वृत्ती जिज्ञासू आहे आणि त्याची बुद्धीमत्ताही चांगली आहे.
१ इ. व्यष्टी साधना : तो प्रतिदिन व्यष्टी साधना करतो, उदा. नियमितपणे नामजप करणे, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, क्षमायाचना करणे, गुरूंचे स्मरण करणे, चुकांचे लिखाण करणे, अत्तर-कापराचे आध्यात्मिक उपाय करणे, बगलामुखी स्तोत्र अन् देवीकवच ऐकणे. तो त्याचे प्रयत्न साधनेच्या आढाव्यात प्रामाणिकपणे सांगतो.
१ ई. साधनेची तळमळ : त्याची प्रकृती बरी नसली, तरी तो साधना परिपूर्ण करतो आणि आढावा देतो.
१ उ. साहाय्य करणे : त्याला कोणतेही काम सांगितले की, तो ते तत्परतेने करतो.
१ ऊ. स्वभावदोष : विसराळूपणा आणि लाजाळूपणा.’
२. सौ. सत्याली देव, चंद्रपूर (साधिका)
अ. रुद्र पुष्कळ स्थिर आणि आनंदी आहे. त्याचे बोलणे ऐकून मला आनंद जाणवतो आणि माझे मन स्थिर होते.
आ. रुद्र साधनेचे सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करतो. काही कारणाने त्याचे साधनेचे प्रयत्न अल्प झाले किंवा झाले नाही, तर तो प्रामाणिकपणे सांगतो.
इ. तो स्वतःची चूक आणि त्याच्या बहिणीची चूक प्रामाणिकपणे सांगतो.
ई. गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) त्याच्या मनात पुष्कळ भाव आहे. त्याला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रार्थना आणि भावप्रयोग घेणे आवडते.
(२१.६.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |