‘साधकांनो, वर्ष २०२४ मध्ये १८ सप्टेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण झाले आणि २ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नसली, तरी त्यांचा काही अंशी परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने ‘ग्रहणाचा विपरीत परिणाम स्वत:वर होऊ नये’, यासाठी भारतासह जगभरातील सर्व साधक २ ऑक्टोबरपर्यंत पुढील नामजप करू शकतात.
१. ग्रहणाचा विपरीत परिणाम टळावा, यासाठीचे जप
अ. महाशून्याचा नामजप : ग्रहणामुळे अरिष्ट टळावे यासाठी ‘महाशून्य’ हा नामजप अर्धा घंटा करणे
आ. ॐ चा नामजप : ग्रहणाचा निर्गुण स्तरावरील एकूण सर्व दुष्परिणाम दूर व्हावा यासाठी ‘ॐ’ हा नामजप अर्धा घंटा करणे
२. पितरांचा त्रास होऊ नये यासाठी दत्ताचा नामजप
पितृपक्षात पितरांचा त्रास होऊ नये यासाठी हा नामजप अर्धा घंटा करणे -‘ॐ ॐ श्रीगुरुदेव दत्त ॐ ।’ (यापूर्वी हा जप एक घंटा करण्यास सांगितले होते. आता या कालावधीत अन्य जपही करायचे असल्याने हा जप अर्धा घंटा करावा. – संकलक)
३. अपघातापासून रक्षण होण्यासाठी ‘महाशून्य’ नामजप वेगळा करणे
या व्यतिरिक्त ‘अपघात होऊ नये’ यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘महाशून्य’ हा नामजप १ घंटा वेगळा करावा.’- ‘दत्त, महाशून्य आणि ॐ ’ हे नामजप सात्त्विक आवाजामध्ये ‘सनातन संस्थेच्या’ संकेतस्थळावरील पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.
लिंक – https://www.sanatan.org/mr/audio-gallery
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२४)