ऑल इंडिया मुस्लिम जमात’ संघटनेची मागणी
बरेली (उत्तरप्रदेश) – ‘इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्या लोकांना कठोर शिक्षा देण्यासाठी ‘पैगंबर-ए-इस्लाम विधेयक’ आणण्याची मागणी मुसलमान संघटनांनी केली आहे. येथे ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’च्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. त्यांचे म्हणणे आहे की, या कायद्यामुळे इतर सर्व धर्मांचे प्रमुख आणि व्यक्ती यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांवरही प्रतिबंध येईल.
मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी सरकार आणि राजकीय पक्ष यांना चेतावणी देतांना सांगितले की, अनेकदा कुणीतरी पैगंबर इस्लाम यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करतो; पण सर्व लोक शांत रहातात आणि कोणतीही कारवाई होत नाही. (अशा प्रकारच्या अवमानानंतर देशात मुसलमान कधीही शांत रहात नाहीत. ते कायदा हातात घेतात, असेच आतापर्यंत दिसून आले आहे ! – संपादक) त्यामुळे संसद किंवा विधानसभा यांमध्ये ‘पैगंबर-ए-इस्लाम विधेयक’ आणावे, जेणेकरून कुणालाही त्यांची प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न करता येणार नाही. सरकार इच्छित असेल, तर या विधेयकाचे प्रारूप कोणत्याही नावाने लागू करू शकते. आमची मागणी आहे की, पैगंबरसाहेबांचा अपमान करणार्यांच्या विरोधात कठोर कायदा असावा. हा कायदा कोणत्याही धर्माच्या प्रमुखांचा किंवा देवतांचा अपमान करणार्यांवर कारवाई करणारा असावा. सध्याचे कायदे अपुरे आहेत; म्हणूनच धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडतात.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांवर, धार्मिक मिरवणुकांवर, हिंदूंवर आक्रमण करणार्यांना, लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूंकी जिहाद आदी जिहाद करणार्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी कधी मुसलमान संघटना का करत नाहीत ? |
(म्हणे) ‘मुसलमानांना त्रास दिला जात आहे ! ’
मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी पुढे म्हणाले की, लव्ह-जिहाद, जमावाकडून हत्या, धर्मांतर, आतंकवाद्यांना अर्थपुरवठा आणि आतंकवाद यांच्या नावाखाली मुसलमानांना भयभीत करून त्रास दिला जात आहे. हे थांबवायला हवे. काही कट्टरपंथी संघटना मुसलमानांच्या मुलींना घाबरवून आणि आकर्षक स्वप्ने दाखवून लग्नाचे प्रयत्न करत आहेत. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक) हे ओळखून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१’च्या कायद्याच्या अनुसार धार्मिक स्थळांची स्थिती कायम राहिली पाहिजे, तरीसुद्धा अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यामुळे देशभरातील वातावरण दूषित होत आहे. समान नागरिक संहिता मुसलमानांना मान्य नाही.
संपादकीय भूमिकाचोर तो चोर वर शिरजोर !’ ही उक्ती सार्थ करणारे बरेलवी ! भारतात मुसलमानांना त्रास दिला जात नसून मुसलमान हिंदूंना त्रास देत आहेत, हेच सत्य आहे ! |