उडुपी (कर्नाटक) येथे हिंदु युवतीवर अल्ताफ याने बलात्कार केल्याचे प्रकरण
उडुपी (कर्नाटक) – उडुपी जिल्ह्यातील कार्कळा येथील अल्ताफ नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या हिंदु युवतीला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा मुसलमान संघटनेने निषेध केला आहे. ‘हिंदु भगिनीवरील बलात्काराच्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. कोणत्याही मुसलमान अधिवक्त्याने अल्ताफचे वकीलपत्र घेऊ नये’, असे आवाहन ‘उडुपी जिल्हा मुस्लिम युनियन’ने केले आहे.
या संघटनेचे माजी सरचिटणीस महंमद शरीफ यांनी सांगितले की, युवतीला मद्यपान कायला लावून, तसेच त्यात अमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. अल्ताफसारख्या विकृत मानसिकतेच्या वासनांध माणसाला कठोर शिक्षा व्हावी. कार्कळामध्ये आम्ही सौहार्दतेचा इतिहास जपला आहे. बाहेरील जिल्ह्यातून आलेले अल्ताफसारखे लोक भाड्याच्या घरात राहून अशी कृत्ये करतात. हे कृत्य मानवतेवर केलेला अत्याचार आहे. केवळ हिंदु समाजानेच नव्हे, तर पूर्ण समाजाने जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात अमली पदार्थांचा वापर झालेला आहे. उडुपी जिल्ह्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थांचे जाळे उघडकीस आणून त्याच्याशी संबंधित आरोपींवरही कठोर कारवाई करावी. आम्ही आमच्या समुदायातूनच अल्ताफला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांमुळे आमच्या समुदायाचे नाव खराब होते. आमच्या समुदायातील कोणत्याही अधिवक्त्याने त्याचे वकीलपत्र घेऊ नये, अशी आमची विनंती आहे.
संपादकीय भूमिकाअशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी मुसलमान संघटना करतील का ? |