रायगड जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या !

  • मुंबई विद्यापिठाचा निर्णय !

  • सुधारित दिनांक नंतर घोषित होणार !

रायगड – रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड – पाली या तालुक्यांमधील सर्व माध्यमाच्या सरकारी आणि खासगी शाळा अन् महाविद्यालये यांना २५ जुलै या दिवशी सुटी घोषित करण्यात आली. मुंबई विद्यापिठाच्या २५ जुलै या दिवशी सकाळी आणि दुपारच्या सत्रात रायगड जिल्ह्यातील संबंधित तालुक्यात होणार्‍या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षांचे सुधारित दिनांक लवकरच घोषित करण्यात येणार आहेत.