लोणावळा येथे २४ घंट्यांत २१६ मिलीमीटर पावसाची नोंद !

लोणावळा – शहरामध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये २१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत लोणावळ्यामध्ये १ सहस्र ४८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ती गेल्या वर्षीपेक्षा २९५ मिलीमीटरने अधिक आहे. पावसामुळे सर्वत्र आल्हाददायक वातावरण सिद्ध झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले इकडे वळू लागली आहेत. त्यातून भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.