ठाणे येथील हिंदु महिलेची छेडछाड आणि मंदिराच्या विटंबनेचे प्रकरण
ठाणे – येथील हजुरी भागात एका हिंदु महिलेची शहजाद शेख याने छेड काढल्यावर तिने आरडाओरडा करून स्वतःला वाचवले. नंतर १०० ते १५० मुसलमान एकत्र जमल्यावर तिने त्यांच्यापासून वाचण्यासाठी येथील शिवमंदिराचा आसरा घेतला. हे मुसलमान या मंदिरात पादत्राणे घालून गेले आणि मंदिराची विटंबना केली. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याविरोधात आंदोलन करून आरोपी शहजाद शेख यावर गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले; परंतु त्याला पोलीस कोठडीच्या ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक विकास आर्. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ओळख असल्याचे दाखवून दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
२३ जूनच्या या घटनेच्या प्रकरणी २७ जून या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला. (हिंदूंवर धर्मांधांनी अत्याचार केल्यावर इतक्या विलंबाने गुन्हा नोंद का होतो ? – संपादक) शेख याच्यावर पीडित महिलेला काही न सांगण्यासाठी धमकी दिल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. पीडित महिला शेख याच्याजवळ भाजी घेण्यासाठी आली होती. सुट्या पैशांवरून वादावादी झाल्याने ती महिला घरी गेली. शेख याने तिच्या घरी जाऊन तिची छेड काढली होती.
‘धर्मवीर आनंद दिघे असतांना ठाण्यातील महिलांकडे धर्मांधांना वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होत नव्हते’, असे म्हटले जाते. या प्रकरणात छेड काढणार्या धर्मांधासह मंदिराची विटंबना करणार्यांना कठोर शिक्षा होऊन पीडिता आणि हिंदू यांना न्याय मिळेल का ? |