काळम्मावाडी धरणक्षेत्रात २ युवा पर्यटक बुडाले !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर – निपाणी येथील १३ युवक राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणक्षेत्र येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील गणेश चंद्रकांत कदम (वय १८ वर्षे) आणि प्रतीक पाटील (वय २२) हे दोघेजण पाय घसरून पडल्याने वाहून गेले आहेत. हे दोघे मृत्यूमुखी पडल्याचे प्रशासनाने घोषित केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आले आहे. पोलीस कर्मचारीही त्यांचा शोध घेत आहेत.