श्रीमती मनीषा खातू यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती

श्रीमती मनीषा खातू

१. रामनाथी, गोवा येथील आश्रमात आलेल्या अनुभूती

अ. ‘रामनाथी आश्रमात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

आ. मी सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन प्रार्थना केल्यानंतर मला चैतन्य मिळाले.

इ. आश्रमात आल्यापासून मन एकाग्र होऊन नामजप भावपूर्ण होत आहे.

२. सद्गुरु प्रेमा कुवेलकर यांना भेटायला जातांना आलेल्या अनुभूती 

अ. ९.१.२०२४ या दिवशी सद्गुरु कुवेलकरआजींच्या घरी जात असतांना मला सूक्ष्म गंध येत होता.

आ. त्यांच्या घराच्या लोखंडी फाटकापासूनच माझा नामजप चालू झाला आणि तो सतत चालूच होता.

३. सद्गुरु आजींना भेटल्यावर आलेल्या अनुभूती

अ. सद्गुरु आजींना भेटून माझी भावजागृती झाली.

आ. मला पुष्कळ चैतन्य मिळत होते.

इ. सद्गुरु आजींची खोली पुष्कळ मोठी आणि प्रकाशमान वाटत होती.

ई. सद्गुरु आजींना भेटून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच भेटल्याचा आनंद झाला.’

– श्रीमती मनीषा खातु (वय ६७ वर्षे), महाड (२५.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक