रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात संशोधनाच्या अंतर्गत ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजण्याची सेवा करणारे श्री. आशिष सावंत यांच्यावर केलेली कविता येथे दिली आहे.
माझा सखा असतो सतत सेवारत ।
त्याच्याभोवती आहे कवच कार्यरत ।। धृ. ।।
आनंदी असणे आहे ज्याचा स्थायीभाव ।
ज्याच्या ठायी सदा श्री गुरूंप्रती भाव ।। १ ।।
नाव तुझे आशिष तुला गुरुरायांचे आशिष (टीप) ।।
भाव भोळा तू श्री गुरूंचा आशिष ।। २ ।।
तुझा सहवास लाभला, मज अत्यानंद जाहला ।
मन मोकळे करण्याकरता मज सखा मिळाला ।। ३ ।।
मित्र असावा तुझ्यासारखा मन जाणणारा ।
आनंदी स्पंदने हास्यातून जगी पसरवणारा ।। ४ ।।
अहोभाग्य तुझे तू विष्णुलोकी रहातोस ।
हृदयमंदिरी तुझ्या बसण्या तू गुरुरायाला आळवतोस ।। ५ ।।
तुझे जीवन कृतार्थ केले श्री गुरूंनी ।
परमार्थाची ओढ देऊनी स्थिरावले श्री गुरूंनी ।। ६ ।।
संशोधनाचा तुझा अभ्यास अन् असे तुला ध्यास ।
सार्थ केलास तू श्री गुरूंचा विश्वास ।। ७ ।।
मनमोकळा स्वभाव तुझा असे सहजता ।
तुझ्या मनी असे अखंड कृतज्ञता ।। ८ ।।
टीप – आशीर्वाद
– श्री. अक्षय नागेश पांडे (वय २४ वर्षे), यवतमाळ