कु. सोहम विंचुरकर याचे ‘महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षे’त सुयश !

कु. सोहम विंचुरकर

चिपळूण, ६ एप्रिल (वार्ता.) – येथील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुमती विंचुरकर यांचा मुलगा कु. सोहम अमोल विंचुरकर याला महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तम यश मिळाले आहे. त्याला ३०० पैकी २०८ गुण मिळाले असून गुणवत्ता सूचीत त्याचा १५८ वा क्रमांक आला. कु. सोहम तालुक्यातील ‘मॅरी माया हायस्कूल’चा विद्यार्थी आहे. कु. सोहमने त्याच्या यशाचे श्रेय आई सौ. सुमती, वडील श्री. अमोल विंचुरकर, शाळेतील शिक्षकवृंद आणि मार्गदर्शक भुवड दांपत्य यांना दिले आहे.