TMC Saayoni Ghosh : सयोनी घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी

शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित

अभिनेत्री सयोनी घोष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी बंगालमधील उमेदवारांची घोषणा केली. या पक्षाने अभिनेत्री सयोनी घोष यांना बंगालमधील जाधवपूरमधून उमेदवारी दिली आहे. सयोनी घोष यांनी वर्ष २०१५ मध्ये  शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असलेले अश्‍लील चित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या.

याविषयी घोष यांनी म्हटले होते, ‘देव यापेक्षा अधिक उपयुक्त असू शकत नाही.’ या चित्रावरून त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला होता. या चित्रावर स्पष्टीकरण देतांना घोष यांनी दावा केला होता की, त्यांचे ट्विटर खाते कुणी तरी हॅक केले आणि हे चित्र ट्वीट केले.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी हिंदु व्यक्ती हिंदु मतदारांच्या माथी मारून तिला निवडून आणण्याचा प्रयत्न करणारा हिंदु व्यक्ती (ममता बॅनर्जी) प्रमुख असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष केवळ बहुसंख्य हिंदू असलेल्या देशातच असू शकतो. हे हिंदूंना लज्जास्पद !