१. जिज्ञासू वृत्तीने धर्मशास्त्र समजून घेऊन धर्मप्रसार केल्यास इतरांचे शंकानिरसन करता येणे शक्य !
हिंदुत्वनिष्ठ : ‘परात्पर गुरुदेव, आम्ही कपाळावर टिळा लावला आहे; परंतु आपण तो लावला नाही, तर कोणत्या हिंदूंनी टिळा लावायला हवा ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : जे साधना करत नाहीत, ते टिळा लावत नाहीत. जे कर्मयोग किंवा ज्ञानयोग या मार्गांतून साधना करतात, त्यांचा आणि टिळा लावण्याचा संबंध नसतो. आपल्या हिंदु समाजात अधिकांश लोक भक्तीमार्गी आहेत. जे भक्तीमार्गानुसार साधना करतात, ते टिळा लावतात. त्यामुळे त्यांनी टिळा लावायला पाहिजे. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊन आपण निर्गुण उपासनेच्या स्तरावर जातो, तेव्हा टिळा लावण्याची आवश्यकता रहात नाही.
आपली आध्यात्मिक पातळी आणि जिज्ञासाही चांगली आहे. तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारत रहा, म्हणजे तुम्हाला योग्य उत्तरे मिळतील ! समाजात धर्मप्रसारासाठी गेल्यावर कुणी असे प्रश्न विचारले आणि आपण त्यांची उत्तरे देऊ शकलो, तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतो. (क्रमश:)