शांतपणा आणि आक्रस्ताळेपणा !

वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी                                            श्री. अभय वर्तक

गेले काही दिवस पत्रकार निखिल वागळे यांच्याशी संबंधित प्रकरणावर परस्परविरोधी प्रतिक्रिया वाचल्यावर एका व्यक्तीची प्रचंड आठवण झाली. अतिशय शांत, संयमित, लोकशाही मूल्यांना जपून वागळेंना एक व्यक्ती सामोरे गेली होती. तेव्हा देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. ‘हिंदु आतंकवाद’ नावाचा काल्पनिक बागुलबुवा उभा करण्यासाठी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला वारंवार लक्ष्य केले जात होते. त्यांचे साधक तुरुंगात डांबले जात होते. अशा वेळी कोणतेही हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना त्यांच्या समवेत जाहीरपणे उभ्या राहिलेल्या नव्हत्या. त्या वेळी ‘आय.बी.एन्. लोकमत’ वृत्तवाहिनीचे संपादक वागळे हे होते. त्यांनी या वाहिनीच्या माध्यमातून साम्यवादी विचारसरणीचा प्रचंड गवगवा केला होता. रात्री होणार्‍या चर्चेत हिंदुत्वनिष्ठांना त्यांचे मत मांडायचा वेळ न देता त्यांच्यावर वागळे हे आक्रमकपणे स्वतःचे मत थोपवायचे. अशाच काळात सनातन संस्थेवर विनाकारण बिनबुडाचे आरोप होऊ लागले. कुठे काही झाले की, लगेच १० मिनिटांत सनातन संस्थेवर आरोप करायचे. अशा स्थितीत अत्यंत शांत, संयमी आणि मुद्देसूदपणे या सर्व आरोपांचे खंडण वागळेंच्या समोर संस्थेच्या या साधकाने ठामपणे केले अन् एकदा चर्चेत तर स्वतःची सुत्रे खोडली जात आहेत, हे पाहून वागळेंचा आक्रस्ताळेपणा वाढला. तेव्हा ही चर्चा सोडून हा साधक ठामपणे बाहेर पडला. पुढे ‘रॉयटर्स’सारख्या प्रसिद्ध वृत्त संस्थेने त्याची नोंद घेत मुलाखतही घेतली. आक्रस्ताळेपणा करणार्‍या वागळेंना त्यांच्याच अनिर्बंध सत्ता असलेल्या वृत्तवाहिनीवर शांतपणे उघडा करणारे होते सनातनचे साधक श्री. अभय वर्तक ! थेट प्रक्षेपणाच्या चर्चेत थंडपणे वागळे आणि साम्यवादी यांचे वाभाडे काढणारे श्री. अभय वर्तक सहजपणे आठवले. ‘लव्ह जिहाद’ भारतात होत आहे’, हे सर्व प्रथम सनातन संस्थेने मांडले होते. तेव्हा अनेकांनी खिल्ली उडवली होती. आज सनातन संस्थेचा विस्तार जगभरात होत आहे.

(१२.२.२०२४)

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.