केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे विधान !
नवी देहली – मी नेहमी गमतीने म्हणतो की, सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे चांगले काम करणार्याला कधीच सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणार्याला कधीच शिक्षा होत नाही, असे विधान केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत कुणाचेही नाव न घेता केले.
Those who do good work never get respect and those who do bad work never get punished : Union Minister Nitin Gadkari
Gadkari expressed concern over opportunist leaders keen on remaining associated with the ruling party.
Read More :https://t.co/dVNm17txoX
Video Courtesy :… pic.twitter.com/yUjQYAFTi0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2024
गडकरी यांनी केलेली विधाने !
१. काही संधीसाधू नेते मूळ विचारांशी तडजोड करून सातत्याने सत्ताधारी पक्षासमवेत रहाण्याचा प्रयत्न करत असतात. मूळ विचारसरणी सोडणे, विचारसरणीचा दर्जा घसरणे हे लोकशाहीसाठी चांगले नाही. निष्ठावान नेते किंवा स्वतःच्या मूळ विचारसरणीवर ठाम असणार्या नेत्यांची संख्या हळूहळू अल्प होऊ लागली आहे.
२. आमच्यातील मतभेद आणि वादविवाद ही आमची समस्या नाही. काही लोकांकडे विचारच नाहीत, ही मोठी अडचण आहे. काही नेते आहेत, जे त्यांच्या मूळ विचारसरणीसह उभे आहेत. त्यांचा दृढनिश्चय सातत्याने दिसून येतो. ते त्यांच्या विचारांची प्रतारणा करत नाहीत; परंतु या नेत्यांची संख्या पुष्कळ अल्प आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी चांगली नाही.
३. राजकारणात सध्या असे काही लोक आहेत जे ना डावे आहेत ना उजवे, ते केवळ संधीसाधू आहेत. हे लोक या ना त्या मार्गाने सत्ताधारी पक्षाशी ताळमेळ राखून असतात.