कृष्णा नदीच्या पात्रात सापडली श्रीविष्णूची श्री रामललाशी साधर्म्य असणारी १ सहस्र वर्षे प्राचीन मूर्ती !

शिवलिंगही सापडले

बेंगळुरू (कर्नाटक) – रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीच्या पात्रात भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या प्रभावळीवर चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. या मूर्तीखेरीज एक शिवलिंगही सापडले आहे. हे दोन्ही १ सहस्र वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जात आहे. सापडलेली भगवान विष्णूची मूर्ती अयोध्येतील श्री रामललाच्या मूर्तीशी साधर्म्य असणारी आहे. विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग आता भारतीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात देण्यात आले आहे.

‘नदीपात्रात सापडलेली मूर्ती आधी एखाद्या मंदिराच्या गाभार्‍यात असावी. इस्लामी आक्रमकांपासून रक्षण होण्यासाठी ती नदीत विसर्जित केली गेली असावी.’ – प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई, रायचूर विद्यापीठ