व्हिडिओ कॉलवरून पिंपरी (पुणे) येथील महिलेची १९ लाख रुपयांची फसवणूक !

पिंपरी (पुणे) – तैवानला पाठवलेले पाकीट (पार्सल) मुंबईमध्ये ‘नार्कोटिक्स’ (अमली पदार्थविरोधी विभाग) विभागाने पकडले आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी ‘नार्कोटिक्स’ विभागाला दूरभाष जोडल्याचे सांगून महिलेला ‘स्काईप’वरून ‘व्हिडिओ कॉल’ करून संपर्क केला. महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून त्यांचे बँक खाते, आधार कार्ड याची माहिती घेतली. बँक खाते उघडण्यास सांगितले. त्या खात्याचा वापर करून महिलेच्या नावावर स्वत:साठी १९ लाख ४ सहस्र १०१ रुपयांचे वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) काढून फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी या दिवशी घडली. आपल्या खात्यावर कर्ज काढले असल्याची माहिती मिळताच महिलेने २८ जानेवारी या दिवशी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून आकाश कुमार, अमानी कोंडाल आणि कर्ज वळते करून घेतलेल्या बँक खातेधारकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

असे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस काय उपाययोजना काढणार आहेत ?