घंटा वाजल्यावर ‘ओम’ असा ध्वनी ऐकू येतो !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसरमधून २ सहस्र ४०० किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे. शेकडो व्यापार्यांनी अष्टधातूची ही घंटा फुलांनी सजवलेल्या रथातून अयोध्येत आणली. या घंटेची उंची ६ फुटांपेक्षा अधिक आहे. शांत वातावरणात या घंटेचा ध्वनी अनुमानेे २ कि.मी.पर्यंत ऐकू येतो. महत्त्वाचे म्हणजे ही घंटा वाजल्यावर ‘ओम’ असा ध्वनी ऐकू येतो.
या घंटेचा साचा ७५ कारागिरांनी ३ महिन्यांत सिद्ध केल्यानंतर ७० कारागिरांनी अवघ्या २५ मिनिटांत घंटा बनवली. यासाठी अनुमाने २५ लाख रुपये खर्च करण्यात आले. यासमवेत प्रत्येकी ५० किलोच्या ७ इतर घंटाही ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला समर्पित करण्यात आल्या. उद्योगपती मनोज मित्तल यांनी सांगितले की, वडील विकास मित्तल यांच्या स्मरणार्थ ही घंटा बनवण्यात आली.