पुण्य किंवा पाप कर्माप्रमाणे जन्म-मृत्यूचे चक्र

‘जशी लाट सागरात मिळून जाते, तसे जोवर जीव ते ‘ब्रह्मतत्त्व’ आणि ‘परमात्मा’ यांत मिळून जात नाही, तोवर हे जन्म-मृत्यूचे चक्र सतत चालूच असते. पुण्य किंवा पाप कर्माप्रमाणे तो सतत जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत रहातो.


दुष्ट अहंगंड पाश्चात्त्य आणि निधर्मीवादी यांची हिंदु धर्मग्रंथांप्रती असुया !

‘ईश्वराच्या खालोखाल स्वतःचीच सत्ता आहे’, असे मानणार्‍या दुष्ट अहंगंड पाश्चात्त्यांनी (आणि त्याच्या इंग्रजी शिक्षणाने विलक्षण प्रभावित झालेल्या आमच्या ‘सेक्युलरी’ (निधर्मी) हिंदु पंडितांनी) श्रुति, स्मृति, पुराणादी वाङ्मयाकडे असुयेने पाहिले. ‘वेद’ ही ग्राम्यगीते आहेत. ती मानवाच्या बाल्यावस्थेतील पंच(महा)भूतांच्या कथांतून निर्माण झालेली बालीश काव्ये आहेत. त्या काळाला ती अनुरूप असली, तरी आज त्यांचा काही उपयोग नाही. ते प्रमाण मानल्यास आमच्या अद्ययावत् तांत्रिक ज्ञानाला (टेक्नॉलॉजी) तुम्ही पारखे व्हाल. असा हिटलरच्या गोबेल्सलाही लाजवणारा प्रचार आणि प्रसार चालू केला. त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२१)