सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव !

डॉ. नितीन करीर

मुंबई – सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक हे निवृत्त झाले आहेत. राज्य सरकारने सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती; मात्र केंद्र सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. सौनिक यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर या कार्यकाळात पदाचे दायित्व सांभाळले होते.

राज्याचे नवे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे १९८८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांचा कालावधी हा ३१ मार्च २०२४ पर्यंत असणार आहेत.