कराड, ३१ डिसेंबर (वार्ता.) – येथील सैदापूर येथील कृषी मंडल अधिकार्याचे कार्यालय फोडून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणार्या २ चोरांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २९ डिसेंबरला रात्री अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात उपयोगात आणलेली दुचाकी शासनाधीन करण्यात आली आहे.
२६ ते २७ डिसेंबर या कालावधीत सैदापूर येथील कृषी मंडल अधिकारी यांचे कार्यालयाचे कुलूप चोरांनी धारदार शस्त्राने तोडले. कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर कृषी साहित्य चोरले. याविषयी कराड शहर पोलीस ठाण्यात कृषी मंडल अधिकारी यांनी तक्रार दिली होती. तक्रार नोंद होताच पोलिसांनी गतीने अन्वेषण चालू केले. पोलीस पथकाने शस्त्राच्या आधारे अखिलेश नलवडे आणि विनोद कोरे या दोघांना गजानन हौसिंग सोसायटी येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात उपयोगात आणलेली दुचाकी पोलिसांनी शासनाधीन केली.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम !