पुणे येथे पवना नदी प्रदूषण मुक्तीचा संकल्प !

पिंपरी (जिल्हा पुणे) – ‘जलदिंडी प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित पवनामाई जलदिंडीचे पवनानगर येथून प्रस्थान झाले होते. त्यापूर्वी लोहगड येथील कार्यक्रमात पवना धरणाची माहिती दिली होती. नदीचे पूजन करून जलदिंडी निघाली होती. चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी घाटावर नुकताच दिंडीचा समारोप झाला. तेथील जिजाऊ उद्यानात ग्रामप्रबोधिनी आणि रावेत येथील एस्.बी. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. पाणी बचतीसह नदी संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला. या वेळी पवना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यायी व्यवस्था करण्याचा संकल्प करण्यात आला.

पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देऊन जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.