हलाल प्रमाणित उत्पादनांवर देशभरात बंदी आणा !

यवतमाळ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

निवेदन देतांना हिंदु महासभेचे श्री. लक्ष्मणलाल खत्री (मध्यभागी) आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ

यवतमाळ, २३ डिसेंबर (वार्ता.) – भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणार्‍या, तसेच केंद्रशासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था भारतात राबवली जात आहे. या अवैध हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेश सरकारने बंदी आणली आहे, त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे, या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्यमांस मुक्त करावी, या मागणीसाठी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. या वेळी २०० हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरीद्वारे समर्थन दिले.

आंदोलनात योग वेदांत सेवा समितीच्या सौ. नीताताई मुंदाफळे, हिंदु महासभेचे श्री. लक्ष्मणलाल खत्री, राष्ट्रसेविका समितीच्या अधिवक्त्या प्राजक्ता टिकले, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातनचे साधक आणि धर्मप्रेमी संजय उर्माले आदी मान्यवर उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी निवेदन स्वीकारले.