मुंबई – महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत अजगर आणि साप यांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आरोपीकडून ९ अजगर आणि २ साप जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपींनी आयात धोरणाचे उल्लघंन केले. अजगर आणि साप यांना पुन्हा बँकॉकला पाठवण्यात येईल. सरपटणारे प्राणी विमान आस्थापनाच्या कह्यात देण्यात आले आहेत. या प्रकरणी प्राणी घेऊन आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली.