काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा !

नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार अन् अन्य आरोपी यांना न्यायालयाने दोषी ठरवून ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. साडेबारा लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी शिक्षा ठोठावली. केदार यांच्यासह मुख्य रोखे दलाल केतन शेठ, तत्कालीन बँक व्यवस्थापक अशोक चौधरी यांसह आणखी तिघांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका :

हे आहे काँग्रेसच्या नेत्यांचे खरे स्वरूप !