येवला (नाशिक) येथे सहस्रो रुपयांचा गुटखा हस्तगत !

प्रतिकात्मक चित्र

येवला – शहरातील नागड दरवाजा भागातील अवैध साठवून ठेवलेला २७ सहस्र ४४० रुपयांचा गुटखा पोलिसांच्या विशेष पथकाने धाड घालून जप्त केला. मुमताज मो. अकबर अन्सारी या महिलेने विक्रीसाठी अवैध गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. पोलीस कर्मचार्‍यांनी धाड घालून २७ सहस्र ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संबंधित महिला पसार असून पोलीस अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका :

राज्यात गुटखाबंदी असतांनाही सहस्रो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक होतेच कशी ?