कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी
ठाणे, ११ डिसेंबर (वार्ता.) – कल्याण (पश्चिम) येथील बाजार परिसरात दुचाकी उभी करण्यावरून विनायक ठाकरे आणि महेश वायले यांचा नवाज शेख याच्याशी वाद झाला. शेख याने दुचाकी खाली पाडल्याने दुचाकीची हानी झाली. हा वाद मिटवल्यानंतर काही वेळाने नवाज शेख याचे वडील समशेर शेख, त्याची आई अन् नवाज शेख याचे काका अक्रम, तसेच अन्य एक व्यक्ती यांनी विनायक यांच्या दुकानात येऊन त्यांचे भाऊ विजय ठाकरे यांना धमकावले. (हा आहे धर्मांधांचा उद्दामपणा ! – संपादक) विनायक यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ‘महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे तक्रार करण्यात आली आहे, तर जिवे ठार मारण्याची धमकी देणार्यांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ नागरिक करत आहेत. (अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? कायदा हातात घेणार्या धर्मांधांवर पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)