फ्रान्समधील ६ विद्यार्थी दोषी

हत्येच्या वेळी अल्पवयीन असल्याने कारावासाची शिक्षा होणार नाही !

प्रतिकात्मक छायाचित्र

पॅरिस (फ्रान्स) – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून फ्रान्समध्ये १६ ऑक्टोबर २०२० या दिवशी सॅम्युअल पॅटी या शिक्षकाचा मुसलमान विद्यार्थ्याने शिरच्छेद केला होता. या प्रकणी पोलिसांनी ६ जणांना दोषी ठरवले आहे; मात्र त्यांना कारागृहात डांबले जाणार नाही; कारण सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येच्या वेळी हे सर्व आरोपी १४-१५ वर्षांचे होते. फ्रान्सच्या ‘युथ कोर्टा’ने त्यांना १४ महिने ते २ वर्षांपर्यंतची निलंबित शिक्षा सुनावली आहे. ही एक अशी कायद्याची व्यवस्था आहे, ज्यामध्ये एखाद्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या व्यक्तीला कारावासाची शिक्षा दिली जात नाही; परंतु जर त्या व्यक्तीने विशिष्ट कालावधीत दुसरा कोणताही गुन्हा केला, तर भविष्यात त्या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा दिली जाऊ शकते. दोषींनी पुन्हा गुन्हा केला, तरच त्यांना शिक्षा होईल.

संपादकीय भूमिका

  • असा कायदा असेल, तर धर्मांध अशा विद्यार्थ्यांनाच जिहादी कारवाया करण्यास सांगतील आणि हेे विद्यार्थी मोकाट सुटतील !