सर्वाधिक अल्पवयीन गुन्हेगारांचे शहर म्हणून मुंबईचा चौथा क्रमांक !

मुंबई – गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक अल्पवयीन गुन्हेगारांचे शहर म्हणून भारतात मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या वर्ष २००२ च्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यात देहली शहर प्रथम क्रमांकावर असून चेन्नई दुसर्‍या, तर कर्णावती (अहमदाबाद) शहर तिसर्‍या क्रमांकावर आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण कायदा (पॉस्को) अंतर्गत नोंदवल्या जाणार्‍या गुन्ह्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

मुंबईतील गुन्हेगारीत चोरी, घरफोडी, विनयभंग, बलात्कार, खून, दुखापत यांत १४ ते १७ वयोगटातील मुलांचा अधिक सहभाग असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. (या वयोगटातील मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत, यासाठी त्यांना लहानपणापासूनच साधना शिकवून नीतीमत्तेचे धडे द्यायला हवेत, हे शासनाने लक्षात घ्यावे ! – संपादक)