तळवडे येथील ग्रामदैवत श्री नवलादेवीच्या मंदिराचे वास्तूपूजन आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठा  

  • ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत होणार विविध कार्यक्रम

  • प.पू. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण

पाचल, ७ डिसेंबर (वार्ताहर) – राजापूर तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री नवलादेवीच्या मंदिराचे वास्तूपूजन आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठा यानिमित्त ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना तळवडेचे सुपुत्र आणि पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थिती असेल.

९ ते १२ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, रात्री ८ पासून भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प.पू. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण

१३ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ ते  १२ या वेळेत श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते कलश प्रतिष्ठापना, तसेच बारा-पाच, गावकार आणि ओणी-कोंडीवळे येथील गगनगिरी मठाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण होणार आहे. या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. या निमित्ताने दुपारी १२ ते १ आरती, १ ते ३ महाप्रसाद,  सायंकाळी ७ ते ९ पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ ते १०.३० सत्कार समारंभ, १०.३० वा. गर्जा महाराष्ट्र माझा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य विश्वस्त आणि कार्यकारिणी यांनी केले आहे.