पुणे – मांजरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील मुलांनी जेवणासाठीचे पैसे वेळेत मिळावेत, प्राथमिक सुविधा मिळाव्यात, वसतिगृहातील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी यांसह इतर मागण्यांसाठी २८ नोव्हेंबरपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. या उपोषणामध्ये ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. (झोपलेला आदिवासी समाज कल्याण विभाग ! विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्या आदिवासी विभागातील संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी ! – संपादक) मांजरी भागातील या आदिवासी कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये ६०० मुले आणि २०० हून अधिक मुली वास्तव्यास आहेत. या वसतिगृहातील मुले-मुली अनेक तक्रारी, तसेच मागण्या यांसाठी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत; परंतु ‘शासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्हाला उपोषण करावे लागत आहे’, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
संपादकीय भूमिकाअसे उपोषण का करावे लागते ? विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासन स्वतःहून का सोडवत नाही ? |